गावाविषयी माहिती
वतनवाड्या डोंगराच्या कुशीत असलेले गाव हे महाराष्ट्र राज्यातील पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील एक प्रभू श्री.हमुमंत भगवान यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले प्रगतशील व ऐतिहासिक गाव आहे.गोंदे बु .गावात दक्षिणमुखी हनुमान मंदिर व मोऱ्हांडा गावात मगरधस मारुती चे मंदिर हे तसेच प्राचीन कालीन शिवमंदिर गावचे धार्मिक केंद्रबिंदू आहे .सन २०११ च्या जनगणनेनुसार या गावाची लोकसंख्या सुमारे ५१६४ आहे. गावामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ८, अंगणवाडी केंद्रे १६ व व्यायामशाळा १,सभामंडप-३ अशी शैक्षणिक व शारीरिक सुविधा उपलब्ध आहेत.तसेच गावामध्ये सन २०२३ पासून पिण्याच्या पाण्याच्या सोईने ग्रामपंचायत मोऱ्हांडा – गोंदे बु पाण्याचा वापर पिण्यासाठी करतात,तसेच गावात पुरातन मंदिरे, सामुदायिक सभागृह, पाणीसाठवण, सार्वजनिक विहिरी व शेततळी अशा धार्मिक व सामाजिक सुविधा देखील आहेत.
गावातील बहुतांश लोकांचा मुख्य व्यवसाय शेती असून भात ,नाचणी ,वरई ही प्रमुख पिके घेतली जातात. भात या पिकांच्या लागवडीमुळे गावातील शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळते,तसेच विविध शासकीय योजना प्रभावीपणे राबविल्या गेल्या आहेत. घरकुल योजना अंतर्गत लाभार्थी यांना घरकुल चा लाभ मिळाला आहे. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत ग्रुप ग्रामपंचायत मोऱ्हांडा – गोंदे बु गावाने संपूर्ण खुले शौचमुक्त (ODF प्लस) दर्जा मिळवला आहे. जलसंधारण व पाणीपुरवठा योजना अंतर्गत गावात पाणीपुरवठा नियमित करण्यात आला आहे. तसेच तंटामुक्ती गाव मोहीम अंतर्गत देखील उत्कृष्ट काम केले आहे.
ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व ११ सदस्य मिळून गावाचा सर्वांगीण विकास घडवून आणला आहे. ग्रामपंचायतीचे निर्णय लोकसहभागातून घेतले जातात.
ग्रुप ग्रामपंचायत मोऱ्हांडा – गोंदे बु.गाव आज मोखाडा तालुक्यातील एक आदर्श व सर्वांगीण विकासाकडे वाटचाल करणारे गाव म्हणून ओळखले जाते.